पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीला बोलावून एकाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी एकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजता पिंपरी येथे घडली.
जोएल एलिक हरबर्ट (वय ४२, रा. वैभव नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सात वर्षीय मुलगी सोसायटीच्या पार्किंग समोर सायकल खेळत होती. त्यावेळी तिच्या सायकलला एक श्वान आडवा आला. श्वानाला घाबरून मुलगी सायकल सोडून जवळ असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पळाली. तिथे आरोपी होता. त्याने मुलीला त्याच्याकडे बोलावले. तिच्याशी गैरवर्तन करून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.