तरुणीचा वारंवार पाठलाग करून संबंध ठेवण्यासाठी दबाव

0
664

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – तरुणीचा कॉलेजमध्ये आणि इतर ठिकाणी पाठलाग करून संबंध ठेवण्यासाठी तरुणाने तिच्यावर दबाव टाकला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत ताथवडे आणि हिंजवडी परिसरात घडली.

याबाबत पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य सुनील काटे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पूर्वी मित्र होते. तरुणीने आरोपीसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नसल्याचे जानेवारी २०२२ मध्ये आरोपीला आणि त्याच्या घरच्यांना सांगितले होते. तरीही आरोपीने तरुणीचा पाठलाग केला. फिर्यादीला त्यांच्या कॉलेजमध्ये येऊन भेटला व त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. आरोपीने त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या फोनवरून फिर्यादिस आणि तिच्या मित्र मैत्रिणींना कॉल करून त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.