सुरक्षेच्या नावाखाली पंतप्रधानांकडून कडून महाराष्ट्रातील नेत्यांचा अपमान; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप

0
361

पिंपरी,दि.१५(पीसीबी) – देहूगाव येथील शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना भाषणाची करण्याची संधी दिली गेली नाही. पंतप्रधान कार्यालाकडे मागणी करून देखील भाषणासाठी नकार देवून भाषणाची संधी न दिल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील बारा कोटी जनतेचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष इम्रान भाई शेख यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान कार्यालय यांच्यावर केला.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या गाडीत त्यांचे पुत्र व राजशिष्टाचार मंत्री तसेच पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना बसू दिले नाही. सुरक्षेच्या नावाखाली महाराष्ट्रातील नेत्यांचा अपमान भाजप करत असून या घटनेबद्दल भाजपने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आदित्य ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी केली.

युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले “पुणे,पिंपरी चिंचवड निवडणुक डोळ्यांसमोर ठेवुनच देहुचा कार्यक्रम होता व इथे भाजपला थेट अजित दादांना सोबत भिडायचे आहे. मागच्या वेळी मेट्रो उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना उपमुख्यमंत्री अजित दादांनी खडेबोल सुनावले होते ह्याचमुळे घाबरलेल्या भाजपने आज दादांना भाषण करु दिले नसले तरी दोन्ही ठिकाणी येणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सत्तेत येणार आहे हे नक्की..

“राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही निषेध आंदोलन करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी परवानगी नाकारली व निषेध आंदोलन रद्द करण्याची विंनती केली. त्या पार्श्भुमीवर आंदोलन रद्द करण्यात आले” असही यावेळी इम्रान शेख म्हणाले. दरम्यान यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या पसंख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.