देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो

0
386

पुणे, दि. १४ (पीसीबी) : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, विकास आणि परंपरा या दोन्ही गोष्टी एकत्रित पुढे गेल्या पाहिजे. भाषणाला सुरुवात करताना मोदी म्हणाले की, भगवान विठ्ठल आणि वाकऱ्यांना मी वंदन करतो. आज देहूच्या या पवित्र भूमिवर येण्याचे सौभाग्य लाभले असून, हे स्थळ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीदेखील आहे. देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचं रुप असल्याचे मोदी म्हणाले.

मागील काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला लागभल्याचे सांगत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली. या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
मोदी म्हणाले की, आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्य केलेली असेल, जी शिळा तुकाराम महाराजांचे वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. या पवित्र स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे मी आभार व्यक्त करतो.

देहूतील संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर सांस्कृतीक भविष्य घडवणारं मंदिर आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देहू इथं शिळा मंदिराचं उद्घाटनं पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी पारं पडलं यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. यामध्ये संतांचा सहवास लाभला की ईश्वराचं दर्शन आपोआप होतं. देहूच्या पवित्र भूमित आल्याचं मला सौभाग्य लाभलं त्यामुळं मी देखील याची अनुभूती घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या शिलान्यासाची संधी मिळाली.
पालखी मार्गांचं काम आठ टप्प्यात पूर्ण होणार

काही महिन्यांपूर्वीच मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या भूमिपूजनाची संधी मिळाली होती. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची सुरुवात पाच टप्प्यात होणार. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम ३ टप्प्यात पूर्ण होईल. या सर्व टप्प्यात ३५० किमीहून अधिक लांबीचे महामार्ग बनतील. यासाठी ११ हजार कोटींहून अधिक खर्च केला जाईल. या प्रयत्नांमुळं या भागातील विकासाला चालना मिळेल, असं मोदी यावेळी म्हणाले.