विमानातून उतरताच मोदींनी ठेवला अजित पवारांच्या खांद्यावर हात!

0
273

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. पुणे विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी विमानातून खाली उतरताच त्यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारपूस केली, तेव्हा पवार यांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.

मोदी आणि अजितदादा यांच्या भेटीचा हा फोटो खूपच बोलका आहे. केवळ राजशिष्टाचाराचा भाग म्हणून नव्हे तर मोदी यांच्या चेहऱ्यावरचे पवार यांच्या प्रति असलेले हावभावसुध्दा चर्चाचा विषय आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीष बापट उपस्थित होते. त्यानंतर हेलिकॉप्टरने मोदी देहूकडे रवाना झाले.
देहू येथेही फडणवीस यांच्या प्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादासुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे सावलीसारखे उभे होते.