धक्कादायक, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ११ तरूण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात

0
397

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकतेच सिद्धेश उर्फ सौरभ महाकाळ याला काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. पुणे ग्रामीण भागातील अकरा तरूण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पंजाबमधील प्रसिध्द गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणात बिश्नोईचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे. याच प्रकरणात कांबळेसह कुख्यात गुंड संतोष जाधवलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशी अकरा तरूणांबाबत माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान व त्याच्या वडिलांनाही बिश्नोई गँगने धमकी दिली आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागातील ११ तरुण बिश्नोई गँग च्या संपर्कात असल्याची माहितीही समोर आली आहे. ग्रामीण भागातील अल्पवयीन तरुणाईला गुन्हेगारी क्षेत्राकडे खेचण्याचा प्रयत्न या गँगकडुन केला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता या तरूणांचा शोध घेण्याचे आव्हानही पोलिसांसमोर असणार आहे.

बिश्नोई हा सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला पहिल्यांदा 2016 मध्ये अटक कऱण्यात आली होती. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, दरोडा असे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहे. तो आधी राजस्थानमधील तुरुंगात होता. पण वर्षभरापूर्वी मोक्काअंतर्गत त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगात आणण्यात आले. तेव्हापासून तो तिथेच आहे.