हॉटेल मालक आणि कामगाराला मारहाण, परस्पर विरोधात गुन्हे दाखल..

0
556

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – हॉटेल मध्ये कचरा साफ करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आठ जणांनी मिळून हॉटेल मालक आणि कामगाराला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री नऊ वाजता हॉटेल मोशी ग्रँड येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

प्रल्हाद मनमोहन सरकार (वय 39, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत बोराटे (वय 25), विशाल बोराटे (वय 30), अशोक बोराटे (वय 35), तनोज बोराटे (वय 30), रवी बोराटे (वय 32), दिलीप बोराटे (वय 35), रवींद्र बोराटे (वय 50), धनंजय बोराटे (वय 30, सर्व रा. बोराटेवस्ती, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल मोशी ग्रँड येथे काम करतात. बुधवारी दुपारी रूममध्ये कचरा साफ करण्यावरून फिर्यादी आणि आरोपींचे भांडण झाले. त्या रागातून आरोपींनी बॅट, हॉकी स्टिक घेऊन फिर्यादी आणि त्यांच्या हॉटेल मालक तुषार नागराणी यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात अनिकेत रवींद्र बोराटे (वय 25, रा. देहूरस्ता मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रल्हाद ईशाद सरकार आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मयुरेश हॉटेलवर राहणारा आरोपी प्रल्हाद याला फिर्यादी यांनी ‘तू रूममध्ये जास्त कचरा करतो. तो वेळच्या वेळी साफ करत जा’ असे सांगितले. त्यावरून आरोपीने फिर्यादीसोबत शाब्दिक बाचाबाची केली. त्यानंतर हॉटेल मोशी ग्रँड येथे कामाला गेल्यावर हॉटेल मालक तुषार याने फिर्यादी यांना फोन करून कचरा साफ करण्यावरून झालेले भांडण मिटवू असे सांगितले. फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत हॉटेल मोशी ग्रँड येथे गेले असता आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच बियरची बॉटल डोक्यात मारून जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.