शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन तडीपार गुंडांना अटक

0
428

देहूरोड, दि. ९ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला आणि शस्त्र विरोधी पथकाने देहूरोड येथे एकाला अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 8) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जुबेर नासिर शेख (वय २५, रा. ओटास्किम निगडी) याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. आरोपी जुबेर शेख याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२० रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला असल्याने देखील त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

अनुराग उर्फ डुंगाना गेशतेलगू (वय १९, रा. देहूरोड) असे शस्त्र विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अनुराग याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २ एप्रिल २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. त्याने बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगले. याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला आंबेडकरनगर देहूरोड येथून अटक केली आहे.