राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

0
357

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यानुसार, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये. राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल.

राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम काय?
नोटिफिकेशन जारी – १५ जून २०२२
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – २९ जून २०२२
अर्ज छाननी – ३० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस – २ जुलै २०२२
मतदानाचा दिवस – १८ जुलै २०२२
मतमोजणी – २१ जुलै २०२२

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून कोणती भूमिका घेतली जाणार, निवडणूक बिनविरोध होणार की दोन्हीकडून उमेदवार घोषित होणार, कोणाच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आगामी काळातच मिळणार आहेत. सर्वांचेच या निवडणुकीवर लक्ष असणार आहे.