लाचखोरीत महसूल विभाग अव्वल

0
461

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मागील सहा महिन्यात राज्यात लाच मागण्यात महसूल विभाग अव्वल तर पोलिस प्रशासन द्वितीय स्थानी असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी २०२२ पासून ३१४ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने गेल्या ३१४ प्रकरणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ३०६ अधिकाऱ्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण १४.३ कोटींची लाच मागण्यात आली.

लाच स्वीकारणाऱ्या ३१४ अधिकाऱ्यांमध्ये ७२ अधिकारी हे महसूल विभागातील तर ६७ अधिकारी हे पोलिस विभागातील आहेत. याबरोबरच मुंबई महापालिकाविभागातील १९ अधिकाऱ्यांना रंगेहाथ लाच घेताना पकडण्यात आले आहे. लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये २० जिल्हा परिषद, २९ पंचायत समिती, ६ वन विभागाचे अधिकारी, ७ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि १३ शिक्षण अधिकारी यांना एसीबीने सापळा रचून रंगेहात ताब्यात घेतले आहेत.