पर्यावरण दिनानिमित्त चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण..

0
457

पिंपरी , दि. ६ (पीसीबी) –

पर्यावरण साठी झाडे लावा,
देश वाचवा,
असं आपण नेहमी ऐकत असतो .. परंतु हे आपल्या कृतीतून फार कमी लोक करत असतात . आपल्याला जगण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात कारण ते केवळ ऑक्सिजनच देत नाहीत तर कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. ते आपल्या भूमीचे सौंदर्य टिकवून ठेवतात आणि तसेच पुरापासून आपले संरक्षण करतात. झाडांना महत्त्व असूनही, मनुष्य त्यांना वेगवान वेगाने तोडत आहे.हे चिंताजनक असून आपण झाडं लावली पाहिजेत अशी शिकवण लहान मुलांना पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या लेखा विभागातील लिपिक श्रीमती अनुष्का अधिकारी यांनी दिलीये ..
पर्यावरण दिनाचं औचित्य साधून त्यांनी आपल्या सोसायटीमधील चिमुकल्या मुलांना वृक्षरोपणाचे फायदे सांगून वृक्षलागवड केली आहे . जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काळेवाडी रहाटणी पवना नगर येथील महानगरपालिकेच्या उद्यानात वृक्षारोपण करण्यात आलं .. वृक्षरोपण हि काळाची गरज असल्याचं श्रीमती अनुष्का अधिकारी यांनी चिमुकल्यांना सांगितलं आहे .
यावेळी अनेक लहान मुलं यांच्यासह सोसायटीमधील काही मंडळी उपस्थित होते..