ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीच घडविला चमत्कार

0
416

– आमदार लक्ष्मण जगताप यांची चिंताजनक प्रकृती दीड महिन्यांत ठणठणीत झाली

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती दीड महिन्यापूर्वी एकदम चिंताजनक स्थितीत होती. पूर्ण जगताप कुटुंबिय आणि आमदार जगताप यांच्या मित्रपरिवारालाही घोर लागला होता. अहोरात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अटोकाट प्रयत्न केले आणि अखेर हात टेकले होते. सलग दहा दिवस आमदार यांच्या प्रकृतित चढ उतार होत होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह अनेक रथीमहारथी तत्काळ धावले.

सगळ्यांनी प्रत्यक्ष रग्णालयात जाऊन जगताप कुटुंबियांकडे विचारपूस केली. खास अमेरिकेतून अंडर ट्रायल असेलेली चार इंजेक्शन आयात केली. त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींपासून सगळ्यांनी धावपळ केली. एक दिवस अक्षरशः दैवी चमत्कार व्हावा तसे झाले. निःश्चिंत पडून राहिलेले आणि गलितगात्र झालेले आमदार जगताप यांनी हाताची बोटे हालवली, डोळे उघडले, पायांची हाचाल केली आणि हासून प्रतिसाद दिला. दिवसागणीक तोळामासा झालेली प्रकृती ठणठणीत झाली. हॉस्पिटलचे डॉक्टर अधिकृत काहीच सांगत नव्हते आणि जगताप कुटुंबिय फक्त तब्बेत सुधारत असल्याचे सांगत होते. त्यामुळे जगताप समर्थकांमध्ये संभ्रम होता, तो दूर करण्यासाठी एक दिवस जगताप यांना हॉस्पिटलच्या काचेच्या खिडकीजवळ उभे केले. चक्क हात हालवत आपल्या समर्थकांना त्यांनी भेटायला वर बोलावले. तो व्हिडीओ माध्यमातून व्हायरल झाला तेव्हा कुठे आमदारांच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. अखेर आज शुक्रवारी सायंकाळी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. स्वतःच्या गाडीत बसून हात करत, गप्पा मारत ते घरी आले. घरात प्रवेश होण्यापूर्वी त्यांच्या सौभाग्यवती आश्विनीताई जगताप यांनी ओक्षण केले आणि देवाचे आभार मानले.

आमदार जगताप यांचा अक्षरशः पुनःजन्म झाला, पण त्याचे सर्व श्रेय जाते ते ज्यपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमला. खरे तर, अगदी मृत्यूच्या दाढेतून आमदार जगताप यांना जीवदान देणारे ते देवदूत म्हणजे हॉस्पिटलचे डॉक्टर्स. डॉ.महेंद्र धडके आणि त्यांच्या टीमच्या कार्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे