पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेतून माहे मे 2022 मध्ये सेवानिवृत्त झालेले पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (ऑप. अॅण्ड इंजि.) सुनिल गवळी, चिफ मेकॅनिकल इंजिनीअर सुनिल बुरसे व झोनल मॅनेजर कैलास गावडे यांचा पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुणेरी पगडी, तुळशीचे रोप, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
पीएमआरडीएचे प्लॅनिंग कमिटीचे सल्लागार, ‘पीएमटी’चे माजी चेअरमन, ‘पीएमपीएमएल’चे माजी संचालक व पुणे महानगरपालिकेचे माजी सभासद अजित आपटे, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार, पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.) सुबोध मेडसीकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकलक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, “आज सेवानिवृत्त होत असलेल्या या तिन्ही अधिकाऱ्यांचे काम प्रेरणादायी असून भविष्यात देखील त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा संस्थेच्या प्रगतीसाठी उपयोग होण्याच्या दृष्टीने त्यांनी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे.”
पीएमआरडीएचे प्लॅनिंग कमिटीचे सल्लागार अजित आपटे म्हणाले, “पीएमपीएमएल ही लोकांची सेवा करणारी संस्था आहे. अशा संस्थेत काम करण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळाली. या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना माझे सांगणे आहे की पीएमपीएमएलशी असलेली नाळ तुटू देऊ नका. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्कात राहून विचारविनिमय करत रहा.”