पिंपरी, दि. ३ – गुरुदेव श्री श्री रविशंकर जीं यांच्या जन्म महिन्या निम्मित आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर केंद्र तर्फे, संत तुकाराम महाराज मंदिरा मध्ये एक अनोखा 3 दिवसाचा समर कॅम्प बालचेतना शिविराटे आयोजन केले होते. शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. मुले व पालकांनाही अप्रतिम अनुभव आला, मुलांसोबत पालकही खूप खुश होते.
३० मे ते १ जून दरम्यान, ह्या अनोख्या मोफत झालेल्या समर कॅम्प मध्ये फक्त खेळ, मस्ती च नव्हते तर आर्ट ऑफ लिव्हिंग चे बालचेतना शिबिर द्वारे लहान मुलांमध्ये नवं चैतन्य जागृत करण्यात आले, त्यांच्या सुप्त गुणाच्या विकास, निरोगी शरीर शांत मन, प्रबळ आत्मविश्वास, समूळ सर्वांगीण विकास यशस्वी जीवन ह्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान, गोष्टी, न्यानसत्र, झुंबा, योग्य आहार जागृती करवले गेले ज्या साठी मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सोबत रोज अल्पोपहार ही देण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हिंग चे वरिष्ठ प्रशिक्षक सचिन नाईक ह्यांनी हे शिबिर घेऊन सर्व बालकांमध्ये एक नव चैतन्य जागृत केले असे सर्व पालकांचा अनुभव आहे.
स्वयंसेवक अमेय जोशी, सीमा जाधव, जयश्री शिंदे, नंदिनी सिंग, गणेश धालपे, रवी सकाते, पल्लवी जाट, योगिता धालपे, संतोष म्हात्रे, रिद्धी जाधव, संतोषी कांबळे, दि एंजल एंटरप्रायझेस ह्यांनी हे शिबिर आयोजित करण्यासाठी उत्तम सहकार्य केले.
शेवटचा दिवस गायक संजना चिस्के ह्यांच्या सुमधुर गायन भजन संध्या ला ही सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.
संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान ह्याचे ही उत्तम सहकार्य लाभले. सर्व पालक व मुलांनाही सर्वांना धन्यवाद आणि अभिनंदन!