8 व्या वेतन आयोगानुसार पगारात वाढ होणार तर किती?

0
3

दि. 16 (पीसीबी) – बजेटपूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना ८ वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नेमकी पगारात वाढ होणार तर किती? असं सवाल उपस्थित होताना दिसत आहेत.

७ व्या वेतन आयोगाला जानेवारी २०२६ मध्ये १० वर्ष पूर्ण होतील त्यामुळे ८ वा वेतन आयोग लवकर लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत होती. अखेर आज केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे 8 वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार आहे. 2025 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रकियेसाठी 1 वर्षाचा कालावधी मिळतो, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

नव्या वेतनाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान २.८६ वर निश्चित केला जाऊ शकतो. जर असे झाले तर, कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारातही त्यानुसार वाढ होईल आणि ती ५१,४८० रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

उदा, ८ व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १८ हजारावरून ३४५०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती.

महागाई भत्त्यातील वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर करण्यात येत होती परंतु ८ व्या वेतन आयोगात त्यात बदल होईल. याशिवाय कमाल पगार ४.८ लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. कर्मचाऱ्यांसह निवृत्तीधारकांनाही किमान १७२०० रुपये पेन्शन मिळेल. पेन्शनधारकांच्या वेतनात २.८८ टक्के वाढ होऊ शकते.

किमान पगार म्हणजे, १८ हजार रुपये हा पगार मुख्यत: सफाई कामगार, लिपिक, सहाय्यक इत्यादी पदांवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. कमाल पगार म्हणजे, लाख ५० हजार हा पगार सचिव, प्रधान सचिव आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिला जातो.