70 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटांसह तरुणाला किवळेतून अटक

0
340

किवळे, दि. २७ (पीसीबी) – 70 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटांसह 22 वर्षीय तरुणाला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.25) किवळे येथील मुकाई चौक येथे करण्यात आला आहे.

ऋतिक चंद्रमणी खडसे (वय 22 रा.देहुगाव) अये अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार किशोर परदेशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 70 हजाररुपये किंमतीच्या बनावट प्रटींग असलेल्या 140 नोटा या चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील 70 हजार रुपयांचा नोटा जप्त केल्या,याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.