543 पैकी 504 खासदार हे कोट्यधीश

0
731

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या 9 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या 543 खासदारांपैकी किती तब्बल 93 टक्के खासदार करोडपती असल्याची माहिती मिळाली आहे. 93 टक्के म्हणजे 504 खासदार हे कोट्यधीश आहेत.

2019 आणि 2014 च्या तुलनेत 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात खासदार कोट्याधीश
4 जूनला देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये निवडून आलेल्या 543 खासदारांपैकी 93 टक्के म्हणजेच 504 खासदार करोडपती आहेत. 2019 आणि 2014 च्या तुलनेत 2024 मध्ये निवडूण आलेले मोठ्या प्रमाणात खासदार हे करोडपती असल्याचे समोर आले आहे. 504 खासदार हे कोट्यधीश आहेत. 2019 मध्ये 88 टक्के खासदार हे कोट्याधीश होते. तर 2014 च्या लोकसभेत 82 टक्के खासदार हे कोट्याधीश होते.

टॉप-3 श्रीमंत खासदार कोणते? त्यांची संपत्ती किती?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या टॉप-3 श्रीमंत खासदारांची संपत्ती मोठ्या प्रमणात आहे. या सर्वांची संपत्ती हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही खासदार एनडीएचे आहेत. निवडणूक हक्क संघटना असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने यावर्षी निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एडीआरच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून निवडून आलेले टीडीपी खासदार चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत खासदार आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. तर तेलंगणातील भाजपच्या चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले कोंडा विश्वेश्वरा रेड्डी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4,568 कोटी रुपये आहे.
तर कुरुक्षेत्र, हरियाणाचे भाजप खासदार नवीन जिंदाल हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1,241 कोटी रुपये आहे.