दि . २८ ( पीसीबी ) – जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांन पाच लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्यासह कार्यालयातील महसूल सहाय्यकालादेखील ताब्यात घेतलं आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल 41 लाखांची मागणी केली होती. यापूर्वी या प्रकरणात 23 लाख रुपये त्यांची घरीही पोहोचले आहेत. मात्र, आणखी 18 लाख रुपयांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली होती. इतके पैसे देण शक्य नसल्याने या लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून लाचखोर विनोद खिरोळकरला अटक केली.
दरम्यान, हे पथक लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी पोहचले असून तिथं त्यांच्या हाती मोठं घबाड सापडलं आहे. त्यामध्ये, तब्बल 50 लाख रुपयांचे सोनं एसबीने जप्त केलं आहे. एसीबीने खिरोळकर यांच्या घरातून तब्बल 13 लाख 06 हजार 380 रुपयांची रोकड, 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत अंदाजे 50 लाख 99 हजार 583 रुपये आहे. तसेच, 3 किलो 553 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत 3 लाख 39 हजार 345 रुपये इतकी आहे.
तसेच, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
49 वर्षीय तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी मौजे तिसगाव येथील 6 एकर 16 गुंठे ही वर्ग दोनची जमीन शासनाची परवानगी घेऊन रजिस्टर खरेदी खत करुन 2023 मध्ये विकत घेतलेली आहे. ही जमीन वर्ग दोनची असल्यामुळं ती खरेदी करण्यासाठी शानास लागणारे चलन जनरेट करुन देण्यासाठी या पूर्वी आरोपींनी 23 लाख रुपये घेतलं होते.
या जमिनीच्या नजाराण्याचा दुसरा टप्पा पुन्हा शासनाकडे भरावयाचा होता. त्यासाठी लागणारे चरल जनरेट करुन देण्याासठी लाचखोर खिरोळकर आणि सहाय्यक दीपक त्रिभुवन यांनी 18 लाखांची मागणी केली होती. इतके पैसे देण जमत नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत विभागशी संपर्क साधाला.
27 मेला तक्रारदाला आरोपी त्रिभुवन याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच लाखाची लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. या ठिकाणी सापला रजून पथकाने त्रिभुवनला अटकेली. त्यानंतर स्वतंत्र पथकाने खिरोळकर यांना ताब्यात घेतलं.