46 वर्षांपूर्वीच्या अशोक खरातच्या शोषण प्रकरणाचा अखेर खुलासा

0
2

दि.०८(पीसीबी)-भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, आता त्याच्या भूतकाळातील धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अनेक महिलांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिस तपासात एक मोठं रहस्य उघडकीस आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 20 व्या वर्षीच अशोक खरातने आपल्या नातेवाईक महिलेसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. यानंतर आता तब्बल 46 वर्षांपूर्वीचे, म्हणजेच 1980 सालातील एक प्रकरणही समोर आले आहे.त्या काळातही खरातने कुटुंबातील एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तो गावातून फरार झाल्याचेही समजते.

सध्या या सर्व प्रकरणांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अशोक खरात प्रकरणाने समाजाला हादरवून सोडले असून, या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लक्ष्मण झाला अशोक खरात…

जवळपास 15 वर्ष बेपत्ता राहिल्यानंतर, तो अचानक त्याच्या मूळ गावी, काहंदलवाडी येथे परतला. असं देखील सांगितलं जातं की, त्याने स्वतःचं नाव बदलून अशोक खरात असं ठेवलं होतं… भोंदूबाबा 15 वर्षांच्या अज्ञातवासात नक्की काय करत होता… याचा शोध पोलीस घेत आहेत. अशोक खरातच्या भूतकाळातील काळे पैलू आता उघड होत आहेत.

सांगायचं झालं तर, अशोक खरात याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरातशी संबंधित 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर व्हायरल करण्यात आले होते.