29 टक्के परतच्याव्याचे आमिष दाखवून व्यावसायीक महिलेची 25 लाख रुपयांची फसवणूक

0
61

हिंजवडी, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी) – कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणूक करत 29 टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्यावसायीक महिलेची 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक जुन 2024 ते 20 जुलै 224 या कालावधीत हिंजवडी व रावेत येथे घडली आहे.

यावरून 38 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वैभव सुनिल देशपांडे (वय 28 रा.रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने नोबल कन्स्ट्रक्शन या कंपनीत पैसे गुंतवल्यास 29 टक्के परतावा मिळेल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी सुरुवातील 1 लाख 25 हजार रुपये गुंतवले . त्याचे एक महिन्यात फिर्यादीला 1 लाख 61 हजार 250 रुपये देण्यात आले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन होताच फिर्यादीला आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यावर 25 लाख 80 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ते पाठवले . आरोपीने ते पैसे न गुंतवता त्याचा स्वतः वापर केला. फिर्यादी यांनी पैशांची मागणी करताच आरोपीने खोटे बँकेचे एनईएफटी व आरटीजीएस दाखवून फिर्यादीची 25 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.