महाराष्ट्र भाजपला नवा कप्तान! रवींद्र चव्हाण होणार प्रदेशाध्यक्ष; ‘या’ दिवशी होणार अधिकृत घोषण

PCB Admin
1 Min Read

दि . २८ ( पीसीबी ) मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असून भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ते प्रदेशाध्यक्षपदासाठी ३० जूनला अर्ज भरणार असून १ जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार आहे.याबाबत वरळी डोम येथे १ जुलैला सकाळी ११ वाजता अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या दिशेने पाऊल टाकत भाजपने शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि एक माजी केंद्रीय आणि विद्यमान खासदार यांची राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची महाराष्ट्र, हर्ष मल्होत्रा यांची उत्तराखंड, तर माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची पश्चिम बंगालचे राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.वरील सर्व जण संबंधित राज्याच्या पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीचे तसेच, राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुकीचे पर्यवेक्षण करतील. राष्ट्रीय निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गुजरात, उत्तराखंड, तेलंगणा, त्रिपुरा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर, पक्ष १५ जुलैपर्यंत आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Share This Article