एरोबिक जिम्नॅस्टिक राज्यस्तरीय पंच परीक्षा शिबिरात पिंपरी चिंचवडच्या हर्षद कुलकर्णी व वृंदा सुतार यांची उज्वल कामगिरी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ३ –
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एरोबिक जिम्नॅस्टिक राज्यस्तरीय पंच परीक्षा शिबिरात पिंपरी चिंचवड शहरातून हर्षद कुलकर्णी आणि वृंदा सुतार यांची निवड करण्यात आली होती.

या शिबिरात दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय पंच परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली असून, आता त्यांची निवड येणाऱ्या राष्ट्रीय पंच परीक्षा शिबिरासाठी झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा ६, ७ व ८ जून २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आली आहे.

या गौरवाच्या क्षणी पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच हेवन जिम्नॅस्टिक अकॅडमीचे प्रशिक्षक, खेळाडू आणि पालकवर्गाने हर्षद आणि वृंदा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी राष्ट्रीय शिबिरासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

या दोघांच्या यशामुळे पिंपरी चिंचवड शहराचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होणार आहे अशी माहिती हेवन जिम्नास्टिक अकादमीचे प्रशिक्षक श्री.चैतन्य कुलकर्णी यांनी दिली.

Share This Article