अब्दुल सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा विजय कुंभार यांचा आरोप

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि २१ ( पीसीबी ) – माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आरोप केला आहे. सत्तारांनी वाढीव अनुदान मंजूर नसताना अनुदान वाढवलं असाही आरोप कुंभार यांच्याकडून चौकशीची मागणी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून शासकीय अनुदान लाटले आहे. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेंतर्गत, २०१५ पासून २ लाख रुपये वार्षिक अनुदान दिले जात होते. तथापि, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचे भासवून ७ ऑक्टोबर रोजी अनुदान १० लाख रुपयांपर्यंत वाढवले गेले आणि १६ शाळांना मंजूरही झाले. या शाळांचा संबंध अब्दुल सत्तार यांच्याशी असल्याचा संशय असून, संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ६ दिवसांत पूर्ण करण्यात आली. हे प्रकरण बेकायदेशीर असल्याने संपूर्ण चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे.

Share This Article