हिंदू धर्माचे वेगळेपण स्वामी विवेकानंदांनी जगाला दाखवून दिले

PCB Admin
1 Min Read

निगडी, दि. ३१ – हिंदू धर्माचा पाया स्वामी विवेकानंद यांनी घालून दिला. शिक्षणाला वेदांताची जोड दिली. हिंदू धर्माचे वेगळेपण स्वामींनी जगाला दाखवून दिले. स्वामींच्या चरित्रातून धर्म व समाज यांची जडणघडण दिसून येते, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी निगडी प्राधिकरण येथे केले.

स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, बाळा शिंदे, सलीम शिकलगार उपस्थित होते. यावेळी बोलताना सोलापूरकर पुढे म्हणाले, हिंदू धर्माची पताका स्वामींनी जगभरामध्ये नेऊन हिंदू धर्माचे वेगळेपण सिद्ध केले. राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उपस्थितांकडून व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Share This Article