अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हैदराबाद दि. 1३ (पीसीबी) :  साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी आज अटक केली. अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये आला होता, त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती.

यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर गांधी हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं.

Share This Article