शहरात वाहतूक पोलिसाला मारहाणीची सलग दुसऱ्या दिवशी घटना

bpcauthor
1 Min Read

दापोडी, दि. २४ (पीसीबी) : महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी घडली. त्यानंतर शनिवारी (दि. 23) सायंकाळी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर दापोडी येथे घडली.

हर्षवर्धन संतोष कदम (वय 19, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी वाहतूक विभागातील पोलीस फुगेवाडी चौक दापोडी येथे वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी हर्षवर्धन कदम हा दुचाकीवरून ट्रिपलसीट आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबविले. त्यावेळी हर्षवर्धन याने वाहतूक पोलिसांना अरेरावीची भाषा वापरत ‘तू माझे काहीच वाकडे करू शकत नाही. थांब तुला आता दाखवतोच’ असे म्हणून पेंटिंगच्या स्प्रे ची बाटली पोलिसांना फेकून मारली. यामध्ये एका पोलिसाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article