घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप

1 Min Read

दि. १७ (पीसीबी ) – राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहिरातीतील काही संदर्भांवर घेतला आक्षेप; मंजुरीसाठी ठरविक भाग काढण्याचे निर्देश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नवीन टीव्ही जाहिरात ‘आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार’ या जाहिरातीला महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने नकार दिला आहे.

ईसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रवादीने राज्यस्तरीय प्रमाणिकरन समितीसमोर निवडणूक प्रचारासाठी आपल्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज केला होता. तथापि, राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला आहे, एक पत्नी आपल्या पतीला विनोदाने म्हणते, “आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या नाहीतर आज रात्री मी तुम्हाला खायला घालणार नाही.” एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. पोल बॉडीने जाहिरातीतील संभाषण “पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी” असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे आणि पक्षाला जाहिरात प्रसारीत करण्यासाठी हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

Share This Article