दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिखली, दि. 23 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने सोमवारी (दि. 21) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास पाटीलनगर चिखली येथे केली.

दशरथ सिताराम कसबे (वय 47, रा. पाटीलनगर, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप पोटे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली की, पाटीलनगर चिखली येथे एक व्यक्ती बेकायदेशीरपणे दारू विक्री करीत आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दशरथ कसबे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला. त्याच्याकडून सहा हजार रुपये किमतीची 60 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article