नदीची पूजा करताना एकजण पाण्यात पडला; त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोघे बुडाले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) मोशी
मोशी परीसातील एका आश्रमात शिकणारे विद्यार्थी इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी घाटावर गेले. तिथे पूजा करत असताना एकजण पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. 19) सकाळी मोशी येथील तापकीर वस्ती येथे घडली. त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे.

ओमकार पथक (वय 16), प्रणव पोतदार (वय 16) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, मोशी परिसरात एका आश्रमात शिकणारे विद्यार्थी सोमवारी सकाळी इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी आले होते. त्यातील एकजण पूजा करताना इंद्रायणी नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी ओमकार आणि प्रणव हे गेले. मात्र पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवताना ओमकार आणि प्रणव हे पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आळंदी येथील एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास बुडालेल्या दोघांपैकी ओमकार याच मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. प्रणव पोतदार याचा शोध सुरु आहे.

Share This Article