घरात दारू पिण्यास मुभा दिली अन मित्राने केली मित्राच्‍याच घरात चोरी

bpcauthor bpcauthor
1 Min Read
crime

दि ४ जुलै (पीसीबी ) – मित्राला आपल्या घरात दारू पिण्यास मुभा दिली. त्यानंतर मित्र आपल्या घरातून बाहेर गेला. दरम्यान दारू पीत बसलेल्या मित्राने घरात कोणी नसल्याने मित्राच्याच घरी दोन लाख 25 हजार रुपयांच्‍या दागिन्‍यांची चोरी केली. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे घडली.

विश्‍वजीत जोशी (वय 35, रा. मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्‍या आरोपी मित्राचे नाव आहे. राहूल दादासाहेब माने (वय 37 रा. मोहनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 2) पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 18 जून रोजी सकाळी पावणे दहा ते पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे मोरवाडी, पिंपरी येथील बंद कंपनीच्‍या आत बसले होते. त्‍यावेळी आरोपी विश्‍वजीत जोशी हा माने यांच्या घरी दारू पित बसला होता. आरोपी जोशी याने फिर्यादी यांच्‍या घरातील पाच तोळे वजनाचे दोन लाख 25 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले.

फिर्यादी यांनी आरोपी जोशी याला चोरीला गेलेल्‍या दागिन्‍यांबाबत विचारणा केली असता त्‍याने उडवाउडवीची उत्‍तरे दिली. मित्र जोशी याला समजावून सांगितल्‍यानंतर तो दागिने परत देईल, असे फिर्यादी माने यांना वाटले होते. मात्र तरीही त्‍याने दागिने दिले नाहीत. अखेर माने यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिल्‍यानंतर पोलिसांनी जोशी याला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article