पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

bpcauthor
1 Min Read

दि 29 मे (पीसीबी ) – पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गावर गोल्डन वजन काटा, चाकण येथे करण्यात आली.

रोहन सुर्यकांत ढेरंगे (वय 19, रा. गुळाणी, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष बनकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर गोल्डन वजन काट्याजवळ एक तरुण पिस्तुल घेऊन आला असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन रोहन याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्टल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article