सासरच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक

bpcauthor
1 Min Read

सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनी येथे घडली.

याप्रकरणी मयत मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी पती विराज मोहन अवघडे (वय 24 रा तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. तसेच विराज याचे वडील मोहन अवघडे व आई यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह 2020 साली विराज याच्याशी झाला होता. मात्र विराज याने प्रियंकाचा वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत छळ केला. मात्र सासू-सासरे यांनी कोणतीही मदत न करता मुलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. पतीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून प्रियंका ने राहत्या घरी गळफास घेत सोमवारी (दि.13) आत्महत्या केली. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article