पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

1 Min Read

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2) सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास राजे शिवाजीनगर, चिखली येथे करण्यात आली.

रुपेश संजय सोनकडे (वय 24, रा. मांजरी, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार निशांत काळे यांनी चीखाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईन रोडवर राजे शिवाजी नगर चिखली येथे एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन रुपेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळले.पिस्टल आणि काडतूस जप्त करत पोलिसांनी रुपेश याला अटक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article