भाजपकडून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी

PCB Admin
1 Min Read

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांची नावे आहेत. नांदेड येथील अजित गोपछडे यांनाही सधी देण्यात आली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यातच आता भाजपने पक्षातील पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह आठ जणांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले असून या उमेदवारांनी कागदपत्रे तयार करण्याची लगबग सुरू केलेली आहे.

Share This Article