कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत तरुणाला लुटले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मारहाण करत तरुणाला लुटले आहे. तसेच हवेत कोयते फिरवून दहशत पसरवली आहे. ही घटना बुधवारी (दि.31) पिंपरी येथे घडली.

हिरालाल श्रीमिसरी मंडल (वय 32 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून लहुया बहोत (रा. पिंपरी), राहुल्या लखन (रा.पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेहमी प्रमाणे त्याचं हमालीचे काम रत असताना आरोपी तिथे आले व त्यांनी शिवीगाळ कऱण्यात सुरुवात केली. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या खिशातून 950 रुपये काढून घेतले तसेच कोयता दाखवून कोणाला काही सांगितले तर याद राख अशी धमकी दिली. यावेळी लोक जमा झाले असता आरोपींनी हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article