2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘हिंदु राष्ट्रा’सह हिंदुहिताच्या मागण्या पूर्ण करणार्‍यांना हिंदूंचा पाठिंबा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

0
230

गोवा , दि. २० (पीसीबी) – गोव्यातील अधिवेशनातून प्रारंभ झालेली हिंदु राष्ट्राची मागणी आता जनतेची मागणी बनू लागली आहे, साधू-संत, राजकीय नेते हिंदु राष्ट्राच्या संदर्भात बोलू लागले आहेत. त्यामुळे आता ‘वीज फ्री, प्रवास फ्री’ अशा भुलथापा नकोत, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची ठोस घोषणा हवी आहे. संपूर्ण भारतात गोहत्याबंदी आणि धर्मांतरबंदी कायदे करणे, हिंदूंच्या देवतांचा अपमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आणणे, वक्फ आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’सारखे अन्यायी कायदे रहित करावेत, आदी हिंदुहिताच्या मागण्या घोषणापत्रात घेऊन त्या पूर्ण करणार्‍या लोकप्रतिनिधींना वर्ष 2024 मध्ये होणार्‍या आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदूंचा जाहीर पाठिंबा असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केले.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंनी राजकीय दृष्टीने जागृत न होणे हे हिंदूंच्या पराभवाचे कारण आहे. जागृत, क्रियाशील आणि संघटित नागरिक हीच लोकशाहीची शक्ती आहे. त्यामुळे स्वदेश, स्वातंत्र्य, समाजव्यवस्था यांविषयी हिंदूंचे अज्ञान, स्वार्थ आणि असंघटितपणा यांवर कार्य करण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्ष त्यांचे घोषणापत्र जाहीर करतात, आता हिंदूंनी संघटितपणे हिंदुहिताच्या मागण्यांचे घोषणापत्र बनवून मते मागण्यासाठी घरी येणार्‍या लोकप्रतिनिधीकडे त्यातील मागण्या करायला हव्यात.’’ 

हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंची सक्षम ‘इकोसिस्टम’ हवी ! – श्री. कपिल मिश्रा, दिल्ली

वर्ष 2022 मध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी बाँब, गोळ्या आणि दगड यांद्वारे हिंदूंवर हिंसक आक्रमण केले. या प्रकरणात अटकेत असलेला अन्सार याचा खटला सर्वाेच्च न्यायालयात लढण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संस्थेकडून लाखो रुपये देण्यात आले. देशात अनेक ठिकाणी आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेल्यांचे खटले ‘जमियत उलेमा-ए-हिंद’कडून लढवले जातात. या संस्थेकडे हा पैसा ‘हलाल’च्या माध्यमातून येतो. ‘केस कापणे’, ‘भाजी खरेदी’ आदी अनेक गोष्टींसाठी हिंदू अन्य धर्मियांना पैसा देत आहेत, तो पैसा ‘जमियत उलेमा-ए-हिंद’पर्यंत जातो आणि हाच पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातो. याचप्रमाणे हिंदूंच्या रक्षणासाठी गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत हिंदूंची सक्षम ‘इकोसिस्टम’ उभारणे अत्यावश्यक असल्याचे ‘हिंदू इकोसिस्टम‘चे संस्थापक श्री. कपिल मिश्रा यांनी सांगितले. या प्रसंगी गोवा येथील ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्या हस्ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी नांदेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपति (पू.)ष.ब्र.प्र.१०८ (डॉ.) विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, ‘‘लिंगायत हिंदूंपासून वेगळे नसून अभिन्न आहेत. वीरशैव लिंगायत हिंदूंचाच एक भाग आहे.’’