तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात

bpcauthor bpcauthor
1 Min Read

कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या या अपघाताबद्दल आता महत्त्वाची माहिती हाती येत आहे.

तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात कुठे झाला?
तानाजी सावंत हे अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीने जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. हा अपघात गाड्यांचा एकमेकांना अंदाज न आल्यामुळे घडल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे तानाजी सावंत यांचा ताफा अपघातस्थळी थांबला होता.

तानाजी सावंत यांची तब्येत कशी?
तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे, मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार तानाजी सावंत यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. या अपघातात तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

Share This Article