रा.स्व.संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात विजयादशमी पथसंचलने उत्साहात

bpcauthor bpcauthor
1 Min Read

– ठिकठिकाणी नागरिकांतर्फे उस्फूर्त भव्य स्वागत

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्याने शहरात मंगळवार दि.२४ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २५ ठिकाणी आकुर्डी, रावेत,हिंजवडी पूनावळे, वाकड थेरगाव, चिंचवड पूर्व – पश्चिम, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, संत तुकाराम नगर, आळंदी, मोशी, संभाजी नगर, चिखली,आळंदी या भागात सकाळी तर देहू, देहूरोड, दिघी, चऱ्होली ,भोसरी, इंद्रायणी नगर भागात सायंकाळी नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न होत आहेत. घोषाच्या तालावर हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन सामूहिकतेचे दर्शन घडविले.विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी विविध भागातील संचलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फूर्तपणे पुष्पवृष्टी , भारत माता की जय च्या जयघोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भव्य स्वागत केले.

Share This Article