कारने धडक दिल्यामुळे सुरक्षारक्षक जखमी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

काळेवाडी, दि. २५ (पीसीबी) – सोसायटीचे गेट उघडून दिल्यानंतर कार आतमध्ये जाताना कारने सुरक्षा रक्षकाला धडक दिली. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडीतील डिवाइन डॅझल सोसायटी येथे घडली.

लक्ष्मण यल्लाप्पा जाधव (वय 65, रा. काळेवाडी गावठाण) यांनी सोमवारी (दि 23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (एमएच 14 केएन 3807) या कारमधील महिला चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण जाधव हे डिवाइन डॅझल सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सोसायटीमध्ये कार आल्याने त्यांनी गेट उघडले. त्यावेळी महिला कार चालकाने कार आतमध्ये नेताना फिर्यादी यांना धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यांच्या उजव्या पायाचा खुबा फॅक्चर झाला. तसेच डोक्यालाही मार लागला.

Share This Article