गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

1 Min Read

वाकड, दि. २५ (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्री प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौधरी पार्क चौक, वाकड येथे करण्यात आली.

फिरोज रजाक शेख (वय 37, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अमित पांडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी पार्क चौक येथे एक व्यक्ती गुटखा घेऊन उभा असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून फिरोज शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक हजार 831 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गुटखा विक्रीसाठी आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article