पिंपरी-चिंचवडमध्ये घडली धक्कादायक घटना ! बेपत्ता १७ वर्षीय मुलीचा आढळला मृतदेह

bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) -: अल्पवयीन बेपत्ता मुलीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. या मुलीचा मृतदेह मंगळवारी (दि. 4) दुपारी घरकुल चिखली येथे मिळाला आहे. १७ वर्षीय मुलगी गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने (वय 44) मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसांनी दिली होती. त्यानंत मुलीचा मृतदेह पोलीसांना मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील एक 17 वर्षीय मुलगी शनिवार (दि. 1) पासून बेपत्ता होती. त्याबाबत मुलीच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस मुलीचा शोध घेत असताना चिखलीमधील घरकुल परिसरातील पडक्या इमारतीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मुलीचा मृतदेह कुजलेला होता. तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे का, हे शवविच्छेदन झाल्यानंतर स्पष्ट होईल. धारदार शस्त्राने मुलीवर वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.याप्रकरणी दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share This Article