वाकड मधून दुचाकी चोरीला

1 Min Read

वाकड, दि. १४ (पीसीबी) – दत्त मंदिर रोड वाकड येथे एका दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना मंगळवार (दि. ७) रात्री अकरा ते बुधवार (दि. ८) दुपारी चार वाजताच्या कालावधीत साऊथ व्हिला दुकानासमोर घडली.

भरतकुमार सरमन ओडेदरा (वय ४९, रा. बालेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरतकुमार यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १२/एमएस १८७१) दत्त मंदिर रोड, वाकड येथील साऊथ व्हील दुकानासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुकानासमोरून दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article