तरुणाला मारहाण करत दात पाडला

1 Min Read

रस्त्याने दुचाकीवरून समांतर जात असलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी कोलमडली. त्यावरून दोघांनी एका दुचाकीस्वार तरुणास बेदम मारहाण करून त्याचा दात पाडला. तसेच दुचाकीचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. २१) सायंकाळी डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

रोहन बाळासाहेब वाळुंज (वय २२, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाळुंज हे त्यांच्या दुचाकीवरून सायंकाळी सात वाजता कामावरून घरी जात होते. डांगे चौक थेरगाव येथे त्यांच्या समांतर आरोपी दुचाकीवरून आले. दरम्यान आरोपींची दुचाकी कोलमडली. त्यावरून आरोपींनी वाळुंज यांना शिवीगाळ करून मारहाण करत दात पडला. वाळुंज यांचे हेल्मेट घेऊन गाडीवर मारून गाडीचे नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article