रस्त्यावर पार्क केलेली रिक्षा चोरीला

1 Min Read

वाकड, दि. १९ (पीसीबी) – घरासमोर रस्त्यावर पार्क केलेली रिक्षा चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री दहा ते रविवारी (दि. 18) पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत काळाखडक, वाकड येथे घडली.

जयराम जालिंदर शिंदे (वय 47, रा. काळाखडक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 60 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 14/एचएम 5109) घरासमोर रस्त्यावर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article