दारू पिऊन घरी आलेल्या पतीला जाब विचारल्याने पत्नीचा खून

PCB Admin
1 Min Read

पिंपरी दि. ११ (पीसीबी) –
पती दारू पिऊन घरी आला. त्यामुळे पत्नीने त्याला जाब विचारला. यावरून पतीने पत्नीचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री मा णगाव हिंजवडी येथे घडली.

शिवम पंकज पचौरी उर्फ भारद्वाज (वय 32, रा. माणगाव, हिंजवडी) असे आरोपीचे नाव आहे. अवंतिका शर्मा (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रंजनकुमार लाडलीमोहन शर्मा (वय 62, रा. उत्तरप्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम गुरुवारी रात्री दारू पिऊन घरी आला. त्यामुळे त्याची पत्नी मयत अवंतिका यांनी शिवम याला जाब विचारला. त्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. शिवम याने अवंतिका यांना मारहाण करून जीवे ठार मारले. पोलिसांनी शिवम याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article