17 मोबाईल, 100 बँक अकाउंट आणि तब्बल 1000 कोटी रुपये

0
18

दि .7 (पीसीबी) – बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर 2024 ला घडली होती. या घटनेनं राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले असले तरी देखील हे प्रकरण अजूनही तापलेलं दिसत आहे. या घटनेत पोलिसांकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. याचवेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

“डायरेक्ट संतोषची बाॅडी…”
गेल्या महिन्याभरापासून राज्यात संतोष देशमुख हत्येप्रकरणात वातावरण तापलेलं आहे. एवढंच नाही तर, राजकीय वर्तुळात देखील याबद्दल विरोधकांकडून आरोप प्रत्योरोप होत आहे. दरम्यान, एक मुलाखतीमध्ये बोलत असताना सुरेश धस यांनी या प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. बोलत असताना धस म्हणाले की, संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यावर त्यांचा भाऊ धनंजय मुंडे यांनी विष्णु चाटेला काॅल केला होता.

यावेळे, दर 20 मिनिटाला काॅल केल्यावर चाटे म्हणायचा की, संतोषला आणून देतो. त्यानंतर धनंजय आणि चाटेचे 35 वेळा काॅल झाला, आणि 36 व्या काॅलनंतर, डायरेक्ट संतोषची बाॅडी दिली. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका हे वाल्मिक कराड आहेत. तर आकाचे आका हे मंत्री धनंजय मुंडे आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.

अंबानी यांना विचारणार-
सुरेश धस पुढे म्हणाले की,अदानी आणि अंबानी सुद्धा वापरत नसतील तेवढे मोबाईल वाल्मिक कराड वापरत आहेत. तसेच मी अंबानी यांना देखील विचारायला जाणार आहे की, तुम्ही नेमके किती मोबाईल वापरता? तसेच नीताताईंना जावून विचारतो. अंबानी यांचे कुणी पीए असतील यांना देखील विचारतो.

याशिवाय आता रतन टाटा यांच्या चिरंजीवांना जावून नतमस्तक होवून त्यांना देखील जाऊन विचारतो की, तुम्ही किती मोबाईल वापरता? कारण आमचे वाल्मिक आण्णा कराड हे तब्बल 17 मोबाईल वापरतात. त्यांचे 100 बँक अकाउंट सापडले आहेत. तसेच त्या अकाउंटमध्ये तब्बल 1000 कोटी पक्षा जास्त पैसे असतील, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे.