15 मिनिटांतच कारच्या काचा फोडल्या आणि पुढे घडलं असं काही…..

0
88

भोसरी, दि. २८ (पीसीबी) : कारच्या काचा फोडून कारमधून एक लाख 80 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी 11:50 ते दुपारी 12:05 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

गंगाराम बाळासाहेब साठे (वय 39, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साठे यांनी त्यांची कार घरासमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली. अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये अज्ञात चोरट्याने कारच्या काचा फोडून कारमधून एक लाख 80 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.