ॲम्बुलन्स मध्ये बसलेल्या महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या ॲम्बुलन्स चालकावर गुन्हा दाखल

0
565

पिंपरी,दि. २९ (पीसीबी) – ॲम्बुलन्स मध्ये बसलेल्या महिलेचे गैरवर्तणूक करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 30 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत आळंदी गावच्या हद्दीमध्ये घडला आहे.

या प्रकरणी 38 वर्षे महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.28) फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून गोरखनाथ दराडे (वय 40) व शिवप्रसाद ससाणे (वय 41) या दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी या ॲम्बुलन्स मध्ये ड्रायव्हर शेजारी असलेल्या सीटवर बसले असताना गोरखनाथ याने महिलेसोबत अश्लील वर्तन करत पिडितेवर अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केला, तसेच शिवप्रसाद यांनीही 10 डिसेंबर रोजी ॲम्बुलन्स मध्येच पिडीतेशी गैरवर्तन केले. तसेच पीडितेला शिवीगाळ करत मी सर्पमित्र असून माझी तक्रार केली तर तुझा खेळ खल्लास करीन अशी धमकी दिली. या दोन्ही प्रकारानंतर पिडीतेने आळंदी पोलीस ठाण्यात दोन्ही ॲम्बुलन्स चालका विरोधात तक्रार दिली असून आळंदी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.