ॲड. गोरक्ष लोखंडे पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनकडून सन्मानित

0
64

पिंपरी, दि. ४ -पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सभासद ॲड. गोरक्ष लोखंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. किरण पवार, ॲड. दिनकर बारणे, ॲड. सचिन थोपटे, माजी उपाध्यक्ष ॲड. योगेश थंबा, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक जगताप, माजी सचिव ॲड. महेश टेमगिरे, नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे; तसेच विद्यमान हिशेब तपासणीस ॲड. संदीप तापकीर, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, खजिनदार ॲड. अजित खराडे, ॲड. अनिल पवार, सदस्य ॲड. फारुख शेख, ॲड. पवन गायकवाड, ॲड. विवेक राऊत, ॲड. शंकर गंगाळे, ॲड. विकी शर्मा, ॲड. मानसी उदासी, ॲड. सुरेखा सय्यद, ॲड. रीना मगदूम, ॲड. खुशी जैन आदी वकील बंधू – भगिनी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी आपल्या मनोगतांमधून ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्याविषयी गौरवोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विद्यमान सदस्य ॲड. अय्याज बाबा शेख यांनी केले. अतिशय उत्साहात सदर कार्यक्रम पार पडला.