ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताकदिन साजरा

0
160

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी अमृतमहोत्सवी ७५वा प्रजासत्ताकदिन नेहरूनगर न्यायालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एस. वानखेडे, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्या हस्ते तिरंगाध्वज फडकविण्यात आला. तसेच पोलीस दलामार्फत ध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माने आणि पौळ तसेच पिंपरी येथील न्यायाधीश एम. जी. मोरे, आर. एम. गिरी, पी. सी. फटाले, व्ही. एन. गायकवाड, ए. एम. बगे, एम. ए. आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी तानाजी दाते, सफाई कामगार सुनंदा बिरूनगीकर, नंदा खुडे, सनी झेंडे, महादेव जाधव, जयेश लोट यांना ‘स्वच्छता दूत’ या पुरस्काराने माननीय न्यायाधीशांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे ॲड. प्रतीक्षा खिलारी आणि उपस्थित न्यायाधीश, सरकारी वकील, पोलीस बांधव, न्यायालयाचे कर्मचारी आणि वकील बांधवांमार्फत सामुदायिक वाचन करण्यात आले.

त्यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सत्यनारायण चांडक, ॲड. सुहास पडवळ, ॲड. सुदाम साने, ॲड. किरण पवार, ॲड. विलास कुटे, ॲड. सतीश गोरडे, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. सुनील कडुसकर, समस्त वकील बांधव आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले आणि कार्यकारणी सदस्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव ॲड. उमेश खंदारे यांनी आभार मानले.